For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायाधीश खानविलकर लोकपाल अध्यक्षपदी

06:33 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायाधीश खानविलकर लोकपाल अध्यक्षपदी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए.एम. खानविलकर यांची मंगळवारी लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. लोकपालचे नियमित अध्यक्षपद 27 मे 2022 रोजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त हेते. लोकपालचे न्यायिक सदस्य न्यायाधीश प्रदीप कमार मोहंती हे प्रभारी अध्यक्ष म्हणून भूमिका बजावत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. न्यायाधीश खानविलकर हे जुलै 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले होते.

सेवानिवृत्त न्यायाधीश लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि ऋतुराज अवस्थी यांनाही लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की यांची लोकपालचे बिगर-न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्त्या कार्यार सांभाळण्याच्या दिवसापासून प्रभावी होणार आहेत.

Advertisement

लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखील निवड समितीच्या शिफारसीच्या आधारावर केली जाते. लोकपालमध्ये एका अध्यक्षासोबत 4 न्यायिक आणि 4 बिगर न्यायिक सदस्य असू शकतात. अलिकडेच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात लोकपालकरता 33.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

.