पुतीनच्या भूमिकेत जूड लॉ
गिउलिआनो दा एम्पोलीच्या पुस्तकावर आधारित चित्रपट
हॉलिवूड स्टार जेड लॉने ‘द विजार्ड ऑफ द क्रेमलिन’ चित्रपटात रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भूमिका साकारत असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पॉल डानो, एलिसिया विकेंडर आणि जॅक गॅलिफियानाकिस देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
जूड लॉ या चित्रपटात पुतीन यांची भूमिका साकारणार आहे. फ्रेंच चित्रपट निर्माते ओलिवियर असायस यांच्याकडून दिग्दर्शित होणाऱ्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट पुतीन यांच्या सत्तेच्या प्रारंभिक वर्षांवर आधारित असणार आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड आहे. ही व्यक्तिरेखा म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखे असल्याचे त्याने म्हटले आहे.
हा चित्रपट गिउलिआनो दा एम्पोली यांच्या पुस्तकावर आधारित आहे. दानो वादिम बरानोवची भूमिका साकारणार आहे. तर प्रचार आणि मीडियाच्या माध्यमातून समाजाला प्रभावित करणाऱ्या एका कलाकाराची ही व्यक्तिरेखा असेल. क्सेनियाच्या भूमिकेत विकेंडर असेल. असायास आणि इमॅन्युएल कॅरेरे पटकथेवर काम करत आहेत.