For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या एकहाती सत्तेनंतर बांद्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

04:46 PM Dec 03, 2023 IST | अनुजा कुडतरकर
भाजपच्या एकहाती सत्तेनंतर बांद्यात भाजप  कार्यकर्त्यांचा जल्लोष
Advertisement

मयुर चराटकर
बांदा

Advertisement

मध्यप्रदेश, राजस्थान व छतीसगड या तीन राज्यात भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर रविवारी बांदा येथे भाजपा पदाधिकारी कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करीत जल्लोष केला. छतीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. मतमोजणी टप्प्या टप्प्याने जाहीर होताच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने आघाडी घेतली आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तीन राज्यात भाजपने मुसंडी मारीत बहुमत मिळविल्यानंतर बांदा कट्टा कॉर्नर येथे पदाधिकारी कार्यकत्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.तसेच वंदे मातरम्,भारत माता की जय,पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच जावेद खतीब, कास सरपंच प्रविण पंडित, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, श्याम मांजरेकर, भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर, दशरथ घाडी, शैलेश केसरकर, सुधीर शिरसाट, सागर सावंत, संदीप बांदेकर, दर्पण आळवे, साईनाथ धारगळकर, सुनील धामापूरकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Tags :

.