महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रिक बाजारात ‘जेएसडब्लू एमजी’चा प्रवेश

06:30 AM Nov 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या तंत्रज्ञानासह अन्य अत्याधुनिक सुविधांनी सज्ज : 2030 पर्यंत बाजारात मजबूत हिस्सेदारीचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जेएसडब्लू एमजी मोटार इंडिया यांनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार विंडसर  बाजारात सादर केली आहे. ही गाडी एसएआयसी मोटार आणि जेएसडब्लू समूह यांच्याशी संबंधीत आहे. या कारमध्ये बॅटरी एज ए सर्व्हिसचा पर्याय दिला आहे. कारची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये ठेवण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

बीएएएसमध्ये आता ग्राहकांना बॅटरी खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच ग्राहकांना प्रती किलोमीटर 3.5 रुपयांचा खर्च होणार आहे. तसेच बॅटरी चार्ज करण्याचा खर्च मात्र ग्राहकांना उचलावा लागतो.

ऑक्टोबरमध्ये विंडसरच्या धांसूची एंट्री

ऑक्टोबरमध्ये विंडसरने 20,000 पेक्षा अधिकचे बुकिंग प्राप्त केले आहे. सदरची कार ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्रीची नोंद करत अव्वल स्थानी राहिली आहे. यामध्ये जवळपास 3,000 युनिट्सची विक्री झाली आहे. यासह ऑक्टोबरला 15 टक्के ग्राहकांनी बीएएएस चा पर्याय निवडला आहे.

टाटा मोटर्सला मोठी टक्कर

जेएसडब्लू एजी ऑक्टोबरमध्ये भारताची दुसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी बनली आहे. यातील एकूण तीन मॉडेल्सची एकूण 4,878 युनिट्स विक्री केली आहे.

ठळक बाबी....

?कंपनी चालू वर्षापर्यंत 70,000 कार्सचे उत्पादन घेण्याच्या तयारीत

?सी सेगमेंट स्पेस, बी सेगमेंट फिचर्स

?2028 पर्यंत 300,000 इतक्या कार विक्रीचे ध्येय

?2030 पर्यंत कंपनीचे ईव्ही बाजारात 30 टक्के हिस्सेदारी प्राप्त करण्याच्या तयारीत

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article