For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएसडब्ल्यू एमजी कार्स महागणार

06:05 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
जेएसडब्ल्यू एमजी कार्स महागणार
Advertisement

1 जानेवारी 2026 पासून नवे दर लागू

Advertisement

नवी दिल्ली :

आता जर एमजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 31 डिसेंबरपर्यंत ती खरेदी करा. कारण, जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने 1 जानेवारी 2026 पासून कारच्या किमतीत 2 टक्केपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. ही वाढ कंपनीच्या सर्व मॉडेल्समध्ये वेगवेगळी राहणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

कच्चा माल महाग होण्यासोबत उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने या वर्षी तिसऱ्यांदा हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, एमजीने 1 जुलै 2025 पासून त्यांच्या कारच्या किमती 1.5 टक्के आणि 1 जानेवारी 2025 पासून 3 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

एमजी इंडियाच्या लाइनअपमध्ये सध्या कॉमेट ईव्ही, हेक्टर, हेक्टर प्लस, अॅस्टर, ग्लोस्टर, विंडसोर ईव्ही आणि आणि ऑल-इलेक्ट्रिक झेडएस ईव्ही यांचा समावेश आहे. कॉमेट ईव्ही 10 ते 20 हजार रुपयांनी महाग होऊ शकते. किंमतीत 2 टक्केपर्यंत वाढ होईल, जी मॉडेल आणि प्रकारानुसार बदलेल.

विंडसर ईव्हीमध्ये सुमारे 30,000 ते 37,000 रुपयांची वाढ होऊ शकते, ज्यामुळे नवीन किंमत 14.27 लाख रुपये ते 18.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) होईल. कोमेट ईव्हीची किंमत वाढ 10,000 ते 20,000 रुपये असेल आणि किंमती 7.64 लाख ते 10.19 लाख रुपयांपर्यंत पोहोचतील. हेक्टर, ग्लोस्टर आणि एस्टर सारख्या इतर मॉडेल्समध्येही अशीच वाढ होईल. कंपनीने सांगितले की हे बदल संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये लागू होतील.

किंमती का वाढत आहेत?

एमजीने कारच्या किमती वाढवण्यामागे मुख्य कारणे दिली आहेत. कंपनी म्हणते की किंमती वाढवून उत्पादन खर्च थोडासा भागवला जाईल, जेणेकरून गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेत घट होणार नाही.

कच्च्या मालाची किंमत: कंपनीने म्हटले आहे की स्टील, लिथियम-आयन बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक चिप्स यासारख्या गोष्टी महाग झाल्या आहेत.

पुरवठा साखळी समस्या: वाढत्या जागतिक लॉजिस्टिक्स आणि शिपिंग खर्चाचा उत्पादन खर्चावर परिणाम होत आहे.

महागाई आणि आर्थिक दबाव: महागाई आणि चलन मूल्यांमधील चढ-उतारांचा ऑटोमोबाईल उद्योगावरही परिणाम झाला आहे.

ईव्ही फोकस: एमजीच्या बहुतेक कार आता इलेक्ट्रिक आहेत आणि बॅटरी उत्पादन महाग आहे. या खर्चाचे संतुलन साधण्यासाठी किंमती वाढवाव्या लागतील.

Advertisement
Tags :

.