जेएसडब्ल्यू समूह करणार 60 हजार कोटींची गुंतवणूक
बस, ट्रक्सची करणार निर्मिती: महाराष्ट्रात कारखाना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अब्जाधिश सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वातील कंपनी जेएसडब्ल्यू समूह चालू आर्थिक वर्षात 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे. यायोगे कंपनी आपला व्यवसाय मजबुत करतानाच विस्तारही करणार आहे. सदरच्या गुंतवणूकीअंतर्गत 636 एकर जमिनीवर पसरलेल्या औरंगाबाद येथील कारखान्यात वर्षाला 10 हजार इलेक्ट्रिक बस आणि 5 हजार इलेक्ट्रिक ट्रकची निर्मिती केली जाणार आहे. वरील रक्कमेपैकी 15 हजार कोटी रुपये हे इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
ग्रीनटेकचा होणार कारखाना
समूहातील कंपनी जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेड महाराष्ट्रात औरंगाबाद येथे नवा कारखाना बांधणार आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक बस आणि टॅक्सची निर्मिती केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या व्यवसायासाठी कंपनी चीनमधील भागीदाराचा शोध घेत असल्याचे समजते. सुरुवातीच्या काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 1487 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.