For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जेएसडब्ल्यू समूह एमजी मोटरमध्ये घेणार हिस्सेदारी

06:09 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
जेएसडब्ल्यू समूह एमजी मोटरमध्ये घेणार हिस्सेदारी

48 टक्के हिस्सेदारी घेण्याचा विचार : कार उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पोलाद उत्पादन क्षेत्रामध्ये सहभागी असणारी सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू कंपनी आगामी काळामध्ये एमजी मोटरमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे समजते. या नव्या भागीदारीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तार व विकासासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

जेएसडब्ल्यू समूह चीनी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी एमजी मोटर इंडियामध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यास इच्छुक आहे. या अंतर्गत एमजी मोटर्सला गुजरातमध्ये नव्या कारखान्याच्या माध्यमातून कार उत्पादनक्षमता वर्षाला तीन लाखपर्यंत वाढवता येण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. एमजी मोटर इंडिया ही चीनमधील प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी एसएआयसी मोटर यांची सहकारी कंपनी मानली जाते.

Advertisement

 किती घेणार हिस्सेदारी

सदरची कंपनी भारतामध्ये विस्तारासाठी गुंतवणूकदारांचा शोध घेत होती. पोलाद उत्पादनासह सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये जेएसडब्ल्यू समूह कार्यरत आहे. सदरच्या समूहाकडून एमजी मोटर इंडियामध्ये 48 ते 49 टक्के हिस्सेदारी खरेदी केली जाणार आहे. या माध्यमातून एमजी मोटरला 5000 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभारता येणार आहे. कंपनीचा गुजरातमध्ये एक निर्मिती प्रकल्प असून दुसरा निर्मिती कारखाना उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. नव्या गुंतवणुकीनंतर कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येऊ शकणार आहे.

किती होणार उत्पादनक्षमता

सध्याच्या कारखान्यातील कार उत्पादन क्षमता ही वर्षाला 1 लाख 20 हजार इतकी आहे. नव्या हिस्सेदारीनंतर दुसऱ्या कारखान्याच्या प्रारंभानंतर उत्पादनक्षमता वर्षाला 3 लाख कार्स इतकी करता येणे कंपनीला शक्य होणार आहे. हलोलजवळ गुजरातमध्ये कंपनीचा पहिला कारखाना असून जवळपासच दुसरा कारखाना उभारण्याची कंपनीची योजना आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 48,866 प्रवासी कारची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 20 टक्के वाढ पॅसेंजर कारच्या विक्रीमध्ये कंपनीने नोंदवली आहे. ही वाढीव मागणी पाहूनच कंपनी नव्या भागीदारीसाठी उत्सुक असून यायोगे क्षमता विस्तार करणे शक्य होणार आहे.

Advertisement
Tags :
×

.