जेएसडब्ल्यू एनर्जीचे .समभाग पुन्हा वधारले
नवी दिल्ली :
शुक्रवार, 16 मे रोजी, वीज क्षेत्रातील कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे शेअरची किंमत 506 च्या पातळीवर पोहोचली आहे. कंपनीच्या मजबूत चौथ्या तिमाहीच्या निकाल आणि लाभांश घोषणेनंतर जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअर्समध्ये ही खरेदी झाली आहे. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 87362 कोटी रुपये आहे. जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 804 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 419 रुपये आहे. गेल्या गुरुवारी, हा शेअर 487 रुपयांच्या किमतीवर बंद झाला.
जेएसडब्ल्यू एनर्जी डिव्हिडंड 2025
जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीने प्रति शेअर 2 रुपये लाभांश म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी 20 टक्के इतका लाभांश जाहीर केला आहे. अॅक्सिस सिक्युरिटी मार्च तिमाहीच्या निकालानंतर, अॅक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेजने जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअरवर खरेदी रेटिंगसह 705 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे.