For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला; जायगावच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

11:57 AM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला  जायगावच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
Advertisement

औंध : जायगांव (ता. खटाव)येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना किरण अशोक राऊत यांच्या प्रयत्नातून फ्लिटगाई फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमार्फत स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, स्टील पाणी बॉटल, आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर शालेय साहित्य मिळाल्याने चिमुकले हरकले होते.

Advertisement

यावेळी प्रभाकर देशमुख, नवनाथ देशमुख, किरण राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.

शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा राऊत, माजी सरपंच नवनाथ देशमुख, प्रभाकर देशमुख, किरण राऊत, यशवंत देशमुख, अशोक राऊत, दत्ता राऊत, संभाजी देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश माने, गणेश पवार, मंगेश उमापे, राजेश जाधव, सचिन शिंदे, धनाजी माने, दत्ता जाधव, नवनाथ यादव, विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते.मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी गिरी यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.