For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोवेल डिसिल्वा यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर

जोवेल डिसिल्वा यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर
Advertisement

सावंतवाडी शहर वार्ताहर : पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखिनीय कार्य करणारे सावंतवाडी येथील जोवेल डमिंग डिसिल्वा यांना छत्रपती संभाजी नगर येथील पहाट फाउंडेशन, यांचा "सह्याद्रीचे शिलेदार - राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे.
जोवेल डिसिल्वा यांनी पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या सर्वागीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पहाट फाउंडेशनच्या निवड समितीने या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना या पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जोवेल डिसिल्वा यांनी पर्यावरण रक्षण, तसेच एक महिन्यापूर्वी त्यांनी जंगलातून खाद्यासाठी सावंतवाडी शहरात येऊन नुकसानी करतात. त्यासाठी त्यांनी जंगली प्राणी शहरात येऊ नये यासाठी जंगलातच फळांच्या बिया रोपण करून भविष्यात प्राण्यांना जंगलातच झाडांच्या फळांचे खाद्य मिळेल, शहर व आजूबाजूच्या गावातील लोकांची फळझाडे, फुले, नारळ यांची नुकसानी टळू शकेल या हेतूने त्यांनी उपक्रम हाती घेतला होता. निसर्गप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख केली होती.जोवेल डिसिल्वा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.