पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी घेणे गरजेचे
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे ; सावंतवाडीत पत्रकार संघातर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.ते सावंतवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयात बोलत होते सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. ऐवळे म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभा पैकी दोन स्तंभ न्यायालय आणि मीडिया असून जनतेला या दोन्ही मधून न्याय मिळतो. मीडिया मधून सर्वसामान्यांना न्याय मिळतो त्यामुळे पत्रकारांचे महत्त्व अबाधित आहे. त्याने आपल्या बरोबर आपल्या कुटुंबीयांची सुद्धा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सकस आहार आणि रेग्युलर आरोग्य तपासणी करून घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
या कार्यक्रमास प्रमुख डॉ. मुकुंद अंबापुरकर,डॉ. संदीप सावंत डॉ.सागर जाधव तसेच जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकरयुवा रक्तदाता संघटना जिल्हाध्यक्ष श्री देव्या सूर्याजी, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले तर राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाबद्दल माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी माहिती दिली अशा प्रकारचे आरोग्य शिबिर राज्यात ठिकठिकाणी घेऊन पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले. रक्तदाता प्रतिष्ठान आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्प देऊन गजानन नाईक आणि अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
रक्तदात्या संघटनेचा रक्तदान करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान असल्याचे सत्कारमूर्ती प्रकाश तेंडुलकर आणि देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अभिमन्यू लोंढे म्हणाले पत्रकारांच्या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदात्या संघटनांचा केलेला सन्मान ही उल्लेखनीय बाब आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे कोणताही मोबदला न घेता रक्तदान करून ही मंडळी अनेकांचे प्राण वाचवत आहेत. आज मोबदल्याशिवाय कुठचीही सेवा मिळत नाही आरोग्य सेवा देताना डॉक्टर्स जशी विना मोबदला सेवा देतात तशी सेवा रक्तदाते संघटना रक्तदान करून देत असल्याबद्दल त्यांनी रक्तदान करणाऱ्या संघटनांचे कौतुक केले.
यावेळी प्रास्ताविकात आरोग्य शिबिराचा उद्देश तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी स्पष्ट केला. 3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा 85 वा वर्धापन दिन असून या दिवशी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेतले जाते. रक्तदान शिबिराच्या ऐवजी रक्तदान करणाऱ्या संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान तालुका पत्रकार संघाच्या वतीने केला जात असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी केले. तर पाहुण्यांचे स्वागत सचिव मयूर चराठकर यांनी केले. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष विजय देसाई अभय पंडित, सदस्य राजन नाईक,उमेश सावंत,महिला पत्रकार दिव्या वायंगणकर, अनुजा कुडतरकर,शैलेश मयेकर, अभय पंडीत , हेमंत मराठे ,अजित दळवी नागेश पाटील तसेच विजय नाटलेकर,जिलानी आगा आदी पत्रकार आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री सुनील राऊळ आणि प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव यांना निमंत्रित करण्यात आले होते मात्र कार्य बाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांनी आपल्या शुभेच्छा या कार्यक्रमास दिल्या यावेळी पंधराहून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य तपासणी केली.