पत्रकारदिनी आरपीडीच्या वतीने पत्रकारांना मायेची शाल!
सावंतवाडीतील पत्रकारांचा केला सन्मान
सावंतवाडी - ६ जानेवारी या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला .आर. पी .डी च्या स्नेहसंमेलन प्रसंगी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पत्रकार बांधवांनी संस्था व शाळेचे ऋण व्यक्त केले. आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये काल विद्यार्थी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते . तसेच शनिवारी मराठी पत्रकार दिन असल्याने पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. समाजासाठी 24 तास झटणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिनी गौरव करावा असा यामागचा उद्देश असल्याचे संस्थाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, प्रवीण मांजरेकर, सचिन रेडकर, अमोल टेंबकर, अनंत जाधव, विनायक गांवस ,निखिल माळकर , अनुजा कुडतरकर शैलेश मयेकर, आनंद धोंड प्रा. रुपेश पाटील, भुवन नाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मांजरेकर म्हणाले स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचा समाजसेवेचा वारसा संस्थाध्यक्ष विकास सावंत पुढे घेऊन जात आहे त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण आज संस्था व शाळेवर करत पत्रकारांचा जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. पत्रकारांची सहसा कोणी आठवण काढत नाहीत परंतु आरपीडी व संस्थाध्यक्ष विकास सावंत यांनी आम्हाला आमंत्रित करत आमचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान उपस्थित पत्रकारांच्या हस्ते शिक्षकेतर कर्मचारी मारुती वावधने यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव प्रा. व्ही. बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, संचालक अमोल सावंत ,सोनाली सावंत ,प्रा. सतीश बागवे , माजी प्राचार्य केटी परब ,प्राचार्य जगदीश धोंड, उपप्रचार्य डॉक्टर सुमेधा नाईक, उप मुख्याध्यापक पी . एम . सावंत आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद कासार यांनी तर आभार शिक्षिका प्रीती सावंत यांनी मानले.