For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गनगरीत उद्या पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा

12:34 PM Jan 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गनगरीत उद्या पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा
Advertisement

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन ; मुख्यालय पत्रकार संघाचे आयोजन

Advertisement

सिंधुदुर्गनगरी । प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने २९ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी ८.३० वाजता जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्यात प्रदर्शनीय सामना होणार आहे.या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाच्या टीमसह आयोजक मुख्यालय पत्रकार संघ तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांची टीम या स्पर्धेत सहभागी होणार आहे. विजेत्या संघास ७७७७ रुपये, उपविजेत्या संघाला ५५५५ रुपये असे रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम समान्याचा सामनावीर आणि मालिकावीर यांची निवड करून त्यांना चषक देण्यात येणार आहे. याचबरोबर स्पर्धेच्या उद्घाटन, समारोप कार्यक्रमासह स्पर्धे दरम्यान भेट देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने 'पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा' भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर चौथ्या वेळी २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री राणे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री आ दीपक केसरकर, आ निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी स्पर्धेच्या उद्घाटन, समारोप या कार्यक्रमास पत्रकारांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लवू म्हाडेश्र्वर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.