महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बातमी केल्याच्या रागातून पत्रकार रवींद्र केसवर यांच्यावर हल्ला! बलात्कार प्रकरणातील बडतर्फ पीएसआय बनसोडे अटक

05:07 PM Apr 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
PSI Bansode arrested PSI Bansode arrested
Advertisement

धाराशिव : वार्ताहर

पत्रकार रवींद्र केसकर यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या ७ दिवसात प्रकारणाचा पोलिसांनी छडा लावला. पाचपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी हा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे असून, आठ वर्षांपूर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून सोमवार एक एप्रिल रोजी मित्राच्या मदतीने त्याने पत्रकार केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

Advertisement

सोमवार १ एप्रिल रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास पत्रकार केसकर कार्यालयातील काम आटोपून घरी जात होते. शहरातील बेंबळी रस्त्यावर त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच प्रतिकार केल्यानंतर मारहाण करून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन देऊन आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या धडाकेबाज मोहिमेनंतर पोलिसांनी अवघ्या सात दिवसात आरोपीचा शोध लावला असून, यातील प्रमुख आरोपी हा शहरातील शाहू नगर येथील प्रेमकुमार सुखदेव बनसोडे असून, त्याने चार मित्रांच्या मदतीने हा प्रकार केला.

Advertisement

शहरातील शाहू नगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर बनसोडे याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला होता. त्याच्यावर पोस्कोसह गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धाराशिव शहरात येऊन पत्रकार परिषदेत हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार आरोपी बनसोडे याला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जामीनवर बाहेर आल्यानंतर त्याने या प्रकरणी केसकर यांनी केलेल्या बातमीचा राग मनात धरून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

पत्रकार केसकर यांच्यावर हल्ला बातमी केल्यामुळे केला आहे. प्रेमकुमार बनसोडे हा पोलीस उपनिरीक्षक असताना म्हणजे ८ वर्षापूर्वी त्याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोस्कोसह गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी धाराशिव येथे येऊन पोलीस प्रमुखांना तातडीने तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. याप्रकरणी न्यायालयाने बनसोडे याला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती.शिक्षा भोगत असताना काही दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता. यानंतर त्याने केसकर यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना अडवून मारहाण केली तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिसिटीव्ही फुटेज, कॉल ट्रेस करून दोन आरोपीचा शोध घेतला. दत्तात्रय भरत नरसिंगे (रा. तांदुळजा, ता.लातूर ) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने बडतर्फ प्रेमकुमार बनसोडे याच्या नियोजनानुसार केल्याचे सांगितले. त्यानंतर शिराढोण पोलिसाच्या मदतीने प्रेम बनसोडे याला कळंब तालुक्यातील जायफळ येथून अटक करण्यात आली आहे. यातील अन्य तीन आरोपीना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन आरोपीना अटक केल्याबद्दल धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

Advertisement
Tags :
DismissedJournalist Rabindra KeswarPSI Bansode arrestedtarun bharat news
Next Article