For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्रकारितेतल्या नटसम्राटाची अकाली एक्झिट !

08:11 PM Jan 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पत्रकारितेतल्या नटसम्राटाची अकाली एक्झिट
Oplus_131072
Advertisement

दै. तरुण भारत संवादचे उपसंपादक, पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन

Advertisement

सावंतवाडी

सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैदानावर फिल्डींग करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.प्रवीण मांजरेकर यांनी कॉलेज जीवनापासूना पत्रकारितेला प्रारंभ केला. प्रारंभी ‘तरुण भारत’चे सातार्डा वार्ताहर, त्यानंतर बांदा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. नंतर काळात ते सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना पत्रकारितेसाठी सावंतवाडी तसा जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कारही मिळाले होते. अलिकडेच त्यांची जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव म्हणून निवड झाली होती. तर त्यांनी याआधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.कॉलेज जीवनापासून त्यांना नाटयक्षेत्राची आवड होती. दरवर्षी राज्य नाटय स्पर्धेत ते नाटके सादर करत. त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली विविध नाटके सादर केली होती. विविध नाटय, एकांकिका स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही ते काम पाहत असत. सावंतवाडी तालुका भंडारी समाज संघटना कार्यातही त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आरोस येथील विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सुषमा मांजरेकर-गोडकर यांचे ते पती होत.बांदा शवागृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असून उद्या गुरुवारी दुपारी त्यांच्यावर सातोसे येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.