For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोतिबा विकास आराखड्याची कामे जलद गतीने करा ! राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची सूचना

12:49 PM Aug 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
जोतिबा विकास आराखड्याची कामे जलद गतीने करा   राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची सूचना
Minister Shambhuraj Desai
Advertisement

शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

श्री क्षेत्र जोतिबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलदगतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाचे कामही महिनाभरात पूर्ण करा, अशीही सूचना मंत्री देसाई यांनी केली.
श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामांबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, जोतिबा विकास आराखड्याची कामे करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने विचार करा. हा परीसर जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात वृक्ष लागवड करा. मंदिर परिसरातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, याची दक्षता घ्या. तांत्रिक सल्ला घेवूनच सांडपाणी व्यवस्थापन करा. मंदिराचे कामकाज व दैनंदिन धार्मिक विधीला व्यत्यय न येता तातडीने कामे सुरु करा. मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विषयांचा आढावा घेवून स्वच्छतेच्या कामांसाठी दोन शिफ्टमध्ये काम करणारी यंत्रणा राबवा, अशा सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.

Advertisement

तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 99 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी तत्काळ उपलब्ध करुन देवू, स्मारकाची नियोजित कामे जलद गतीने पूर्ण करुन लोकार्पण करण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण विकास आराखड्याचा 1 हजार 816 कोटी रुपयांचा कमीत कमी बांधकाम व पर्यावरण पूरक बांधकामाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. आराखडा करतेवेळी जैवविविधता जपणूक, वनीकरण, डोंगर माथ्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्त्राsत आदी गोष्टीचा विचार केला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक जलसाठ्यांचा विकास करुन त्यांना पुनर्जिवीत करण्यात येणार आहे. डोंगरमाथ्याचा नैसर्गिक उतार, पाण्याचे स्त्राsत विचारात घेण्यात आले आहेत. येथील बांधकामामध्ये कमीतकमी आरसीसी साहित्याचा वापर होईल. जैवविविधता बगीचा, फुलपाखरु बगीचा, पक्षीतीर्थ, केदार विजय गार्डन, हत्ती कुरणे, प्राणी व पक्षी संग्रहालय, अपारंपरीक उर्जा स्त्रोतांचे माहिती केंद्र व संग्रहालय पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिली.

Advertisement
Tags :

.