For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jyotiba Pradhikaran: प्राधिकरण आराखडा जोतिबा ग्रामस्थांना विचारात घेऊनच - जिल्हाधिकारी येडगे

11:04 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
jyotiba pradhikaran  प्राधिकरण आराखडा जोतिबा ग्रामस्थांना विचारात घेऊनच   जिल्हाधिकारी येडगे
Advertisement

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

Advertisement

जोतिबा डोंगर : महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे जोतिबा विकास प्राधिकरणाचा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. या टप्प्यासाठी २५९ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या प्राधिकरणासाठी वाडीरत्नागिरी जोतिबाच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी सहमती दर्शवली नव्हती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामस्थ आणि प्रशासन यांची जोतिबा यात्री निवास येथे बैठक झाली.

या बैठकी दरम्यान ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ या प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ प्राधिकरणावरील चर्चेसाठी तयार झाले. ग्रामस्थांना विचारात घेऊन प्राधिकरण आराखडा पूर्ण करू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

Advertisement

जोतिबा प्राधिकरण आराखड्यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद सागताना खासदार थैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, जोतिबा विकास प्राधिकरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानंतर पहिल्या टप्प्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला.

या प्राधिकरणासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याने जोतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. जोतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी गुरुवारी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा केला जाणार यांची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये प्राधिकरण करत असताना ग्रामस्थांना विचारात घेऊन प्राधिकरण करावं अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. ग्रामस्थांना विचारात घेऊन प्राधिकरण आराखडा पूर्ण करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकयन, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या सह प्रशासनातले अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.