महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एनटीपीसीमुळे खचले नव्हते जोशीमठ

06:33 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जियोलॉजिकल सर्व्हेच्या अहवालाचा निष्कर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ जोशीमठ

Advertisement

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याप्रकरणी जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल समोर आला आहे. जानेवारी 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याने आणि इमारतींना तडे गेल्यामुळे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र जोशीमठमध्ये 65 टक्के घरांचे नुकसान झाले होते. उंच इमारतींच्या स्वरुपात अनियमित पायाभूत सुविधांचा विकास आणि नैसर्गिक जलनिस्सारणाच्या मार्गात फेरफार यासाठी कारणीभूत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पामुळे पर्वतीय क्षेत्रात भूस्खलन झाले नसल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच जीएसआयच्या या अहवालात अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना देखील सुचविण्यात आल्या आहेत.

जियो सायंटिस्ट आणि जियो टेक्नोलॉजिस्टच्या अंतिम चौकशी अहवालात अनेक उपाययोजना नमूद आहेत. यात जोशीमठ आणि औलीच्या अधिक उंचीवरील हिस्स्यात नव्या बांधकामांना अनुमती न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच बांधकामांची कठोरपणे तपासणी करण्याची सूचना सामील आहे. जोशीमठ आणि औलीच्या पर्वतीय भागांमध्ये रस्ते रुदीकरण यासारखी कामे टाळण्याची शिफारस अहवालात आहे.

कारणांचा उल्लेख

पाण्याचा विस्फोट हा एनटीपीसीच्या 520 मेगावॅट तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पासाठी भुयारांच्या ड्रिलिंगमुळे झाला नव्हता. 2010 मध्ये तत्कालीन चमोली जिल्हाधिकाऱ्यांकडून मल्टी डिसिप्लनरी टीमकडून तपासणी करविण्यात आली होती. टीमला देखील जोशीमठ क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्या सुरुगांविषयी दाव्यासंबंधी कुठलाच पुरावा मिळाला नव्हता. हे भुयार 2011 मध्ये निर्माण करण्यात आले होते.

लोकांनी ठरविले प्रकल्पाला जबाबदार

जलविद्युत प्रकल्पाचा विरोध करणारे लोक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी मागील वर्षी निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटासाठी भुयाराला जबाबदार ठरविले होते. राज्य सरकारच्या मूल्यांकन अहवालानुसार जोशीमठ येथील 2152 घरांपैकी 1403 घरांचे नुकसान झाले होते. यातील 472 घरांची आता ‘बिल्ड बॅक बेटर’ तत्वानुसार पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे. तर 931 घरांची दुऊस्ती किंवा रेट्रोफिटिंग करण्यात येणार आहे.

अनियमित विकास

अनियमित विकासाने जोशीमठ क्षेत्राला सर्वाधिक अस्थिर केले आहे. अनियोजित पायाभूत सुविधांमुळे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाल्याने पाण्याचा फैलाव होऊ लागला. यामुळे संरचना आणि नैसर्गिक उतार नष्ट झाले आणि यातून जमीन खचल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article