जोश लुकासचा ब्रायनासोबत विवाह
येलोस्टोन’ सीरिजमधील अभिनेता
हॉलिवूड अभिनेता जोश लुकास हा येलोस्टोन आणि स्वीट होम अलबामा या प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अलिकडेच हवामानतज्ञ ब्रायना रफालोसोबत व्हॅटिकन सिटीत विवाह केला आहे. हा खासगी सोहळा त्याचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. जोश आणि ब्रायना हे 2022 पासून परस्परांच्या सोबत होते.
34 वर्षीय ब्रायनाने इन्स्टाग्रामवर विवाहसोहळ्याची छायाचित्रे शेअर केली आहेत. व्हॅटिकन सिटीत हा पवित्र संस्कार पार पडल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत असे ब्रायनाने म्हटले आहे. तर 54 वर्षीय जोशने कॉमेंटदाखल मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो, हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिन असल्याचे नमूद केले आहे. जोश आणि ब्रायनाने दोन वर्षांपर्यंत डेटिंग केल्यावर मागील वर्षी जून महिन्यात एंगेजमेंट केली होती. तर जोशचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने जेसिका सिएनसिन हेनरिकेजसोबत विवाह केला होता. त्यांचा हा विवाह 2012-14 पर्यंत टिकला होता. जोशला एक मुलगा देखील आहे.