जोसेफ आर्फिंनिंग, एमएसडीएफ, सेंट जोसेफ विजयी
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित अस्मिता खेलो इंडिया मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ एफसी, जोसेफ आर्फिंनिंग, एमएसडीएफ संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रत्येकी दोन गुण मिळविले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेंट जोसेफ एफसीने बेळगाव वुमन्स एफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला इफा अत्तारच्या पासवर गौतमी जाधवने पहिला गोल केला. 20 व्या मिनिटाला गौतमीच्या पासवर इफा अत्तारने दुसरा गोल करून 2-0 आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना अपयश आले. दुसऱ्या सामन्यात जोसेफ आर्फिंनिंगने संत मीरा एफसीचा 2-1 असा निसटता पराभवक केला. या सामन्यात 9 व्या मिनिटाला जोसेफच्या अरन्याच्या पासवर अन्नपूर्णा के. ने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
17 व्या मिनिटाला जोसेफच्या रश्मीच्या पासवरती अन्नपूर्णा के. ने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 4 थ्या मिनिटाला संत मीराच्या मोनिकाच्या पासवर दिपीकाने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. या सामन्यात संत मीरा संघाला पराभवास सामोरे जावे लागले.तिसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने बिटा स्पोर्टस क्लबचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात 4 व 20 व्या मिनिटाला अवनिश सानिकोपच्या पासवर श्रावणी सुतारने सलग दोन गोल केले. 8 व्या व 13 व्या मिनिटाला श्रावणी सुतारच्या पासवर वसंधुरा चव्हाणने सलग दोन गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला वसुंधराच्या पासवर अवनिश सानिकोप्पने 5 वा गोल केला. तर 38 व्या मिनिटाला वसुंधराच्या पासवर श्रावणी सुतारने 6 व्या गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली.