‘जॉली एलएलबी 3’ लवकरच भेटीला
अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याची कहाणी एका खटल्याची असून न्यायालयात 2 जॉली दिसून येतील. जेव्हा दोन जॉली आमने-सामने येतील, तेव्हा डबल कॉमेडी, गडबड होईल असे म्हणत निर्मात्यांनी याचा ट्रेलर सादर केला आहे. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सुभाष कपूर यांनी पेलली आहे. तर आलोक जैन आणि अजित अंधारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या फ्रेंचाइजीचा पहिला चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता, ज्यात अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला हे कलाकार होते. तर दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले होते. मग 2017 मध्ये चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित करण्यात आला, ज्यात अक्षय कुमार, हुमा कुरैशी, अन्नू कपूर आणि कुमुद मिश्रा यांनी काम केले होते.