For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी वाहतूक प्रश्नावर उद्या संयुक्त बैठक

सावंतवाडी वाहतूक प्रश्नावर उद्या संयुक्त बैठक
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी स्वागत केले. यावेळी सावंतवाडी शहरातील विविध समस्या तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.

Advertisement

शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येबाबत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे लक्ष वेधले. यावर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नगरसेवक, व्यापारी, पोलीस विभाग, एसटी विभागाचे अधिकारी तसेच रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी शहरातील वाहतूक प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.