For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज प्रश्नावर उद्या सावंतवाडीत संयुक्त बैठक

11:33 AM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वीज प्रश्नावर उद्या सावंतवाडीत संयुक्त बैठक
Advertisement

आ. प्रमोद जठार राहणार उपस्थित ; समस्या मांडण्याची नागरिकांना संधी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

मे, जून महिन्यातील रखरखत्या उन्हामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील ग्राहक हैराण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.ही बैठक शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी १२ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे होणार आहे. बैठकीस वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. वनमोरे (कुडाळ) तसेच सावंतवाडी अर्बन विभागातील सर्व अभियंते उपस्थित राहणार आहेत.शहर व परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या विविध समस्या, वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी दाबाचा वीज पुरवठा आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून नागरिकांना आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने आमदार प्रमोद जठार यांनी ही बैठक आयोजित केली असून, सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सावंतवाडीचे सभापती आनंद नेवगी तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.