For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीतर्फे परुळे येथे १६ ऑगस्टला ‘हयग्रीवासूर संहार’ संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग

लोकमान्य सोसायटीतर्फे परुळे येथे १६ ऑगस्टला ‘हयग्रीवासूर संहार’ संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री देव आदिनारायण देवस्थान, परुळे येथे भव्य संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘हयग्रीवासूर संहार’ आयोजित करण्यात आला आहे.दशावतार या कोकणच्या समृद्ध लोककला परंपरेला प्रोत्साहन देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. दशावतार कलेतील प्रसिद्ध कलाकारांच्या सहभागामुळे या नाट्यप्रयोगाला विशेष रंगत येणार असून, नाट्यरसिकांना पारंपरिक दशावतारी कलेचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.

Advertisement

या नाट्यप्रयोगामध्ये हयग्रीवासूर यांची भूमिका श्री. दादा राणे कोनसकर, पुलोमा श्री. संजय लाड, नारद श्री. साईल लाड, विष्णू श्री. आनंद कोरगावकर, माळी श्री. कृष्णा घाटकर, ब्रह्मा श्री. निखिल परब, इंद्र श्री. आनंद नार्वेकर, शंकर श्री. दाजी सावंत, जयंती श्री. गौतम केरकर, भ्रूगू श्री. विलास गवस आणि शुक्राचार्य यांची भूमिका श्री. उदय राणे कोनसकर साकारणार आहेत.
तसेच हार्मोनियम - संदीप कोनसकर, पाखवाज - श्री अर्जुन सावंत आणि तालरक्षक श्री समीर तेंडोलकर आदी साथसंगत करणार आहेत.

या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमास सहप्रायोजक म्हणून श्री. सचिन देसाई मित्र मंडळ, परुळे, हॉटेल लीला’ज, भोगवे आणि हॉटेल लालचिरा, कोरजाई, आदिनारायण देवस्थान परुळे तसेच तरुण भारत संवाद यांचे सहकार्य लाभले आहे.या नाट्यप्रयोगास परिसरातील नागरिक, दशावतारप्रेमी आणि नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.