महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडूतील ‘टीएमसी’ रालोआत सामील

06:22 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपसोबत आघाडी करत लढविणार निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला तामिळनाडूत एक सहकारी मिळाला आहे. जी.के. वासन यांच्या नेतृत्वाखालील तमिळ मनीला काँग्रेसने (टीएमसी) भाजपसोबत आघाडीची घोषणा केली आहे. तमिळ मनीला काँग्रेस आता  रालोआतील सहकारी म्हणून भाजपच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी पालादम येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत सामील होणार असल्याचे वासन यांनी सोमवारी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूत भाजपची ही पहिली अधिकृत आघाडी आहे. तमिळ मनीला काँग्रेसने राज्यातील 2021 ची विधानसभा निवडणूक अण्णाद्रमुक आणि भाजपसोबत आघाडी करत लढविली होती. अण्णाद्रमुकसोबतची आघाडी तोडण्याची संकेत तमिळ मनीला काँग्रेसने दिले आहेत. अण्णाद्रमुकने सप्टेंबर महिन्यात रालोआतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती.

रालोआत आगामी काळात आणखी अनेक पक्ष सामील होतील. तर जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. देशाचा आर्थिक विकास आणि सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे आमचे मानणे आहे. अशा स्थितीत तमिळ मनीला क्रेँसने  भाजप आणि त्याच्या रालोआला समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वासन यांनी सांगितले आहे.

जी.के. वासन यांच्या घोषणेनंतर तामिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी त्यांची भेट घेतली आहे. भाजपविरोधात जो करण्यात आलेला दुष्प्रचार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्याचे दिसून येईल असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे.

भाजप तामिळनाडूत यावेळी पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढविणार आहे. अण्णाद्रमुकसोबत आघाडी करण्याचा भाजपचा प्रयत्न होता, परंतु यात यश आले नाही. अशा स्थितीत भाजपने राज्यातील छोट्या पक्षांना साथीला घेत पाठबळ वाढविण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article