महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिवाळे गावात भाजपला धक्का

05:07 PM Oct 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उपसरपंच लक्ष्मण परब यांनी हाती घेतली मशाल

Advertisement

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला शिवसेनेत प्रवेश

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मा. खासदार निलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच भाजप कार्यकर्ते शिंदे गटात न जाता भाजपला सोडचिठ्ठी देवुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताना दिसत आहेत.आज मालवण तालुक्यातील भाजप हिवाळे उपसरपंच लक्ष्मण परब यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देउन कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे तसेच हिवाळे मनसे चे कार्यकर्ते युवराज धुरी यांनी देखील प्रवेश केला आहे. या सर्वांचे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे. हिवाळे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते हिवाळे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहेयावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास प्रवेशकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत हिवाळे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी उपसरपंच लक्ष्मण परब, युवराज धुरी,राकेश मेस्त्री,दीपक पवार, संजय साळकर,लक्ष्मण पांचाळ,पांडुरंग परब,शरद भोगले, सिद्धार्थ पवार या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.याप्रसंगी आडवली-माडली विभागप्रमुख बंडु चव्हाण,पक्षनिरीक्षक रामु विखाळे, संजय पारकर,बाबा आंगणे,माजी शाखाप्रमुख संजय परब,माजी उपसरपंच पुरुषोत्तम खेडेकर,सचिन परब,रविंद्र परब,बलवंत परब, विठ्ठल घाडी, रूपेश परब, शुभम परब,अक्षय परब, अजित परब,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # konkan update # news update
Next Article