For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूक सायकल फेरीत प्रचंड संख्येने सामील व्हा!

11:43 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
मूक सायकल फेरीत प्रचंड संख्येने सामील व्हा
Advertisement

महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन 

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी मूक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल फेरीत मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. या सायकल फेरीची सुऊवात संभाजी उद्यान महाद्वार रोड येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार असून बेळगाव, शहापूर आणि टिळकवाडी भागात फिरून मराठा मंदिर खानापूर रोड येथे जाहीर सभा होणार आहे.

भाषावार प्रांतरचना करताना 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला. या अन्यायाविऊद्ध सीमाप्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे 1 नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते. अन्याय झालेला सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा, या मागणीसाठी येथे जनतेने लोकशाहीप्रणित सारे मार्ग चोखाळलेले आहेत. सत्याग्रह, मोर्चा, हरताळ, संप, उपोषण आणि इतर लोकशाहीमार्गाने लढे करून येथील जनतेने केंद्र सरकारकडे वेळोवेळी न्याय देण्याची विनंती केली आहे.

Advertisement

तथापि केंद्र सरकारमध्ये मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सीमाभागाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. सारे मार्ग चोखाळल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्यावतीने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांना प्रतिवादी बनवून सर्वोच्च न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे. पण याही बाबतीत अक्षम्य दिरंगाई होत आहे. पुन्हा एकदा येथील मराठी भाषिक जनतेचा निर्धार व्यक्त करण्यासाठी म. ए. समितीच्यावतीने सीमाभागात वेगवेगळ्या प्रकारे काळ्यादिनी निषेध प्रकट करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व मराठी भाषिकांनी भाग घेऊन निषेध व्यक्त करावा, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.