महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डामरेत उबाठा शिवसेनेला धक्का !

11:54 AM Apr 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश ; आ. नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

कणकवली तालुक्यातील डामरे गावातील उबाठा शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून डामरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच बबलू सावंत, डांबरे सरपंच किरण कानडे, ग्रा.स‌. संतोष मेजारी, उपसरपंच सागर साटम, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी आदि उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun bharat news# bjp # nitesh rane# kankavali # tarun bharat news# update #
Next Article