For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जॉनी डेप करणार पुनरागमन

06:49 AM Aug 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
जॉनी डेप करणार पुनरागमन
Advertisement

हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता जॉनी डेपला मागील 8 वर्षांपासून मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करत होते. आता अखेर अभिनेता पुनरागमनासाठी सज्ज आहे. तो एका वेगळ्या शैलीत परतणार असून त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘एबेनेजर’ हा त्याचा आगामी चित्रपट एक ख्रिसमस कॅरोल आहे. हा एक ख्रिसमस फँटेसी हॉरर थ्रिलर असून त्याचे दिग्दर्शन टी. वेस्टने केले आहे.

Advertisement

चित्रपटात जॉनी डेपसोबत एंड्रिया राइजबोरो, सॅम क्लॅपिन, डेजी रिडले, आर्थर केंटी, एली बॅम्बर, चार्ली मर्फी आणि इयान मॅककेलन हे कलाकार आहेत. चित्रपटातील सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे यात 63 वर्षीय जॉनीचा लुक आहे. हा लुक पाहून पहिल्या नजरेत त्याला ओळखणे कठिण आहे.

हा चित्रपट चार्ल्स डिकेंस यांच्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’वरा आधारित असून यात एक कठोर आणि कंजूष व्यक्ती एबेनेजर स्क्रूजची कहाणी मांडण्यात आली आहे.एबेनेजरला ख्रिसमसच्या भेटवस्तूंबद्दल तिरस्कार आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्याचा मृत्युमुखी पडलेला बिझनेस पार्टनर जॅकब मार्लेचे भूत अन् तीन आत्मे येतात आणि त्याला त्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दाखवितात. भूत आणि आत्मा मिळून कशाप्रकारे त्याला बदलतात यावरच याची कहाणी बेतलेली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.