चराठा येथील जॉन डिसोजा यांचे निधन
04:29 PM Jun 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
उद्या सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
चराठा कोळसेकर टेंब येथील निवृत्त शिक्षक जॉन मोनिका डिसोजा (६१) यांचे सोमवारी १५ जून रोजी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. ते मुंबई-कल्याण येथील लॉर्ड्स हायस्कूल मधून निवृत्त झाले होते. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, भाऊजय, पुतणे असा परिवार आहे. येथील जेफ डिसोजा यांचे ते वडील होत तर मुंबईस्थित शिक्षक अँथोनी डिसोजा यांचे ते भाऊ होत.
Advertisement
Advertisement