For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅक्शन-थ्रिलरपटात दिसणार जॉन अब्राहम

06:45 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅक्शन थ्रिलरपटात दिसणार जॉन अब्राहम
Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीचा दमदार अभिनेता जॉन अब्राहम अॅक्शनच्या बाबतीत सर्वात प्रभावी मानला जातो. सध्या जॉनचे नाव त्याच्या एका आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. ज्यात तो अन्य एका हिरोसोबत अॅक्शनची डबल धमाल करताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एक प्रख्यात दिग्दर्शन करणार आहे. आगामी काळात जॉन अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. 90 च्या दशकापासून आतापर्यंत बॉलिवूडमध्ये डबल हिरो अॅक्शन थ्रिलर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. जॉन याप्रकरणी पसंतीचा कलाकार राहिला आहे, कारण त्याने फोर्स आणि ढिशूम यासारख्या अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे, ज्यात दोन हिरो होते. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर करणार आहे.

Advertisement

शिवम नायर यांनी मागील वर्षी द डिप्लोमॅट हा चित्रपट निर्माण केला होता. तर आगामी चित्रपटात जॉनसोबत दुसरा अभिनेता कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. निर्मात्यांकडून याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. जॉन आगामी काळात रोहित शेट्टीचा चित्रपट ‘राकेश मारिया’ आणि फोर्स 3 या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.