For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गुरु’ चित्रपटात जॉन अब्राहम

06:27 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गुरु’ चित्रपटात जॉन अब्राहम
Advertisement

सायकोलॉजिकल थ्रिलर धाटणीचा चित्रपट

Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणून जॉन अब्राहमला ओळखले जते. मागील वर्षी प्रदर्शित ‘द डिप्लोमॅट’नंतर जॉन मोठ्या पडद्यापासून दूर राहिला आहे. परंतु आगामी काणत तो जोरदार पुनरागमन करताना दिसून येतील. त्याच्या आगामी चित्रपटात सायकोलॉजिकल थ्रिलर ‘गुरू’ सामील आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. जॉनचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता करत आहे. दासगुप्ता यांना ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘कोडनेम : तिरंगा’ चित्रपटासाठी ओळखले जाते. गुरू या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या लंडनमध्य सुरू आहे. चित्रपटात जॉनसोबत दानिश पंडोर, आरिफ जकारिया आणि किटू गिडवानी यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनयासोबत जॉन या चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे.

जॉन पुढील वर्षी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनातील चित्रपट मारियामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर फोर्स फ्रेंजाइजीचा तिसरा चित्रपट फोर्स 3 मध्ये अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत देखील तो झळकणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.