For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोहेरी मोल ठरली ‘मिस वर्ल्ड 2026’

06:29 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोहेरी मोल ठरली ‘मिस वर्ल्ड 2026’
Advertisement

 डोमिनिकन रिपब्लिकला बहुमान : स्पेनची एलिझाबेथ उपविजेती

Advertisement

वृत्तसंस्था/ न्हा ट्रांग (व्हिएतनाम)

डोमिनिकन रिपब्लिकची जोहेरी मोल डोमिंग्वेझ ही सौंदर्यवती ‘मिस वर्ल्ड 2026’ ची मानकरी ठरली. शनिवारी व्हिएतनाममधील न्हा ट्रांग येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात मिस वर्ल्ड 2025 ओपल सुचाता चुआंगश्रीने जोहेरीला विजेतेपदाचा मुकुट प्रदान केला. स्पेनची एलिझाबेथ रेनेस यंदाच्या स्पर्धेची उपविजेती ठरली. मलेशियाची तानुसिया चेट्टी तिसऱ्या स्थानी राहिली. भारताचे प्रतिनिधित्व करणारी निकिता पोरवाल टॉप 20 मध्ये स्थान मिळवू शकली नाही. निकिता पोरवालने केवळ ‘टॉप 40’च्या फेरीपर्यंत धडक मारली. आता पुढील वर्षीची ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा टांझानियामध्ये आयोजित केली जाणार असल्याचेही शनिवारी जाहीर करण्यात आले.

Advertisement

मिस वर्ल्ड 2026 चा भव्य अंतिम सोहळा शनिवार, 5 सप्टेंबर रोजी व्हिएतनाममध्ये न्हा ट्रांग येथे रंगला होता. या स्पर्धेत निकिता पोरवाल भारताचे प्रतिनिधित्व केले. ही स्पर्धा भारतात जिओ हॉटस्टारवर प्रसारित करण्यात आली. याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 5:30 वाजता सुरू झाले होते.

मिस वर्ल्ड 2025 चा अंतिम सोहळा गेल्यावर्षी 31 मे 2025 रोजी हैदराबादमधील हिटेक्स प्रदर्शन केंद्रात पार पडला होता. मागीलवर्षी या स्पर्धेत 108 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकला होता. इथिओपियाची हॅसेट डेरेस प्रथम उपविजेती ठरली. पोलंडची माजा क्लजडा द्वितीय उपविजेती ठरली, तर मार्टिनिकची ऑरेली जोआकिम तृतीय उपविजेती ठरली होती.

Advertisement
Tags :

.