For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो जोनसचे डेमी मूरसोबत डेटिंग

06:05 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो जोनसचे डेमी मूरसोबत डेटिंग
Advertisement

61 वर्षांची हॉलिवूड अभिनेत्री

Advertisement

प्रियांका चोप्राच्या पतीचा भाऊ जो जोनस स्वत:च्या रिलेशनशिपवरून पुन्हा चर्चेत आहे. मागील वर्षी जो जोनस आणि अभिनेत्री सोफी टर्नर यांचा घटस्फोट झाला होता. आता एक वर्षानंतर 34 वर्षीय जो चे नाव 61 वर्षीय अभिनेत्री डेमी मूरसोबत जोडले जात आहे.  दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा हॉलिवूडच्या वर्तुळात जोरदार सुरू आहे.  दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.

चार्लीज एंजल्स आणि इंडिसेंट प्रपोजल यासारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध डेमी मूर अभिनयासोबत स्वत:च्या उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. याचमुळे तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. डेमी मूर अणि जो जोनस हे अलिकडेच एकत्र दिसून आले आहेत.

Advertisement

जो आणि डेमी यांना फ्रान्सच्या एंटिबसमध्ये एका हॉटेलमध्ये पाहिले गेले. द सबस्टेंस या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर डेमीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जोने स्वत:चा भाऊ निकसोबत हजेरी लावली होती.

सोफी टर्नरसोबत घटस्फोट घेतल्यावर जो जोनस हा मॉडेल स्टॉर्मी बीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनीही पाच महिन्यांपर्यंत डेटिंग केले, मग त्यांचा ब्रेकअप झाला होता.

ए फ्यू गुड मेन यासारख्या सुपरहिट चित्रपटांची अभिनेत्री डेमी मूर घटस्फोटित आहे. तिने तीन विवाह केले आहेत. 2011 मध्ये डेमीने तिसरा पती एश्टन कुचरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासून ती सिंगल आहे. डेमीचा दुसरा पती ब्रूस विलिस होता, जो सध्या फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया आजाराने ग्रस्त आहे.

Advertisement
Tags :

.