कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फूड टेक्नॉलॉजीतून नोकरीची हमी

12:18 PM Jul 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे :

Advertisement

फूड टेक्नॉलॉजी हे केवळ एक शैक्षणिक क्षेत्र नसून, मानवाच्या आरोग्याशी, अन्नसाखळीशी आणि जागतिक अन्न सुरक्षेशी जोडलेलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळेच या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. फूड टेक्नॉलॉजी हे जागतिक स्तरावर प्रचंड मागणी असलेले क्षेत्र आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना रिसर्च, उत्पादन आणि फूड सेफ्टी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

Advertisement

फूड टेक्नॉलॉजी हा कुकिंग कोर्स नसून, सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचे मिश्रण आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील फूड अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाचे विद्यार्थी देश-विदेशातील नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच शासकीय अन्न व औषध प्रशासनातील विविध पदावर रूजू झाले आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा या अभ्यासक्रमाकडे वाढत आहे.

शिवाजी विद्यापीठात बी. टेक. फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम 2008 पासून सुरू आहे. हा चार वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रत्येक वर्गात 60 विद्यार्थी आहेत. सुरूवातीपासूनच या अभ्यासक्रमाला मागणी वाढत आहे. या अभ्यासक्रमात पदार्थ कसा तयार करायचा हे शिकवले जात नाही. तर फूड प्रोसेसिंगसह इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान शिकवले जाते. एखादे प्रोडक्ट तयार करताना त्यामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजेत, याचा अभ्यास केला जातो. फूड प्रोसेसिंग, डेअरी प्रोसेसिंग, मीट पोल्ट्री अॅण्ड एग्ज प्रोसेसिंग, ऑईल प्रोसेसिंग, चॉकलेट, बेकरी प्रोसेसिंग यासंदर्भातील तांत्रिक गोष्टी शिकवल्या जातात. खाद्य पदार्थांमधील कार्बोहायड्रेटस, प्रोटिन्स, फॅटस्, मिनरल्स, विटॅमिन्सचे महत्व आणि प्रमाण शिकवले जाते. तसेच फूड पॅकेजिंगमध्ये जास्तीत जास्त दिवस अन्न कसे टिकेल त्यासाठी काय केले पाहिजे. यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.

त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी मिळते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी स्वत:चे स्टार्टअप सुरू करून व्यवसाय करतात. जास्तीत जास्त विद्यार्थी परदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार कंपन्यांमध्ये 6 महिन्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीच्या कामाची संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय त्याच कंपनीत नोकरीची संधीदेखील मिळण्याची शक्यता असते. कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम तयार केल्याने विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायाची शंभर टक्के हमी आहे. भारतात पिकणाऱ्या अन्नधान्यावर प्रक्रिया करून बदलत्या जीवनशैलीनुसार अन्न निर्मिती केली जात आहे. खाण्यापिण्याची पध्दती बदलल्या असल्याने नूडल्स, पास्ता, रेडी टू सर्व्ह, रेडी टू ड्रिंक फूड, रेडी टू इट अन्नपदार्थांमध्ये कोणकोणते घटक असले पाहिजेत, यावर विद्यार्थी अभ्यास करतात. संशोधन करून त्याचे उद्योगामध्ये रूपांतर करून बाजारात उपलब्ध करीत आहेत. काही विद्यार्थ्यांनी न्यूट्रेशनयुक्त चॉकलेट किंवा जेली तयार करण्यावर संशोधन केले आहे. अमेरिका, युरोप, नायलंड या देशांमध्ये अन्नप्रक्रिया करण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील जास्तीत जास्त विद्यार्थी परदेशात देशात काम करत आहेत. खरोखरच, अलीकडच्या काळात फूड टेक्नॉलॉजी (इदद् ऊाम्प्हदत्दुब्) या क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. अन्नप्रक्रिया, अन्नसुरक्षा, पोषणतत्वे, गुणवत्ता नियंत्रण आणि अन्नसंवर्धन या सर्व बाबतीत वाढती गरज लक्षात घेता, फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे वाढलेला दिसतो.

2020-21                  40 टक्के

2021-22                 60 टक्के

2023-24                 50 टक्के

2024-25                 60 टक्के

राज्य शासनाने यंदा पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विषयाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी प्रवेशाचा कटऑप 90 टक्केपेक्षा जास्त असतो. नोकरी मिळण्याची खात्री असल्याने बारावीनंतर बी. टेक आणि पदवीनंतर एम.टेकला विद्यार्थी प्रवेश घेतात. आयसीटी मुंबईनंतर शिवाजी विद्यापीठातील फुड टेक्नॉलॉजी अव्वल मानले जाते.
                                                                 - डॉ. इराणा उडचाण (विभागप्रमुख,फूड टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ)

 

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article