For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट गुणपत्रिकेद्वारे तलाठ्याची नोकरी

07:56 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बनावट गुणपत्रिकेद्वारे तलाठ्याची नोकरी
Advertisement

चौघा जणांना 2 वर्षांच्या कारावासासह 76 हजारांचा दंड

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बारावीची बनावट गुणपत्रिका देऊन तलाठ्याची नोकरी मिळवणाऱ्या चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसऱ्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व 19 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाचे न्यायाधीश गुरुप्रसाद सी. यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. राजू वेंकटेशप्पा टी., राहणार आनेहळ्ळी, ता. मुळबागिलू, जि. कोलार, मोहनकुमार चंद्राप्पा, राहणार कुन्नीबंडी, ता. मुळबागिलू, मंजुनाथ पैचाप्पा, राहणार मद्देरी, ता. मुळबागिलू, बालकृष्ण वेंकटप्पा, राहणार आनेहळ्ळी, ता. मुळबागिलू यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारतर्फे महांतेश चळकोप्प यांनी काम पाहिले.

बनावट गुणपत्रिका तयार करून मिळविली होती नोकरी

6 सप्टेंबर 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता बेळगाव जिल्ह्यातील महसूल खात्यात रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. वरील चौघा जणांनी बेंगळूर येथील कोणाकडे तरी बनावट गुणपत्रिका तयार करून घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ती जमा करून मेरिटवर नोकरी मिळविली होती.

मेरिट दाखवण्यासाठी त्यांनी बनावट गुणपत्रिका तयार केल्याचे लक्षात येताच तत्कालिन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी या चौघा जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी होऊन भादंवि 420, 465, 468, 471, 466 कलमांतर्गत केलेल्या गुन्ह्यांसाठी दोन वर्षे कारावास व प्रत्येकी 19 हजार रुपयेप्रमाणे एकूण 76 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

फसवणूक...

चौघा जणांनी बेंगळूर येथून बनावट गुणपत्रिका तयार कऊन घेतली

जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून मेरिटवर नोकरी मिळविली

Advertisement
Tags :

.