For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएनके इंडियाचा आयपीओ येणार

06:52 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेएनके इंडियाचा आयपीओ येणार
Advertisement

पुढील आठवड्यात खुला होणार : 300 कोटींचे नवे समभाग सादर करणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जेएनके इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात 23 एप्रिलपासून खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूकदार अर्ज करू शकतात. आयपीओ 25 एप्रिलपर्यंत खुला राहील. जेएनकेचे आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांना वाटप सोमवार, 22 एप्रिल रोजी होणार आहे. आयपीओमध्ये 300 कोटींचे नवीन समभाग सादर केले जातील अशी आशा आहे. तर 8,421,052 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत ठेवले जातील, असेही म्हटले जात आहे.

Advertisement

निधी कुठे वापरणार?

कंपनी निव्वळ उत्पन्नाचा वापर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच करू इच्छिते.

शेअर्स वाटपासाठी जेएनके इंडियाचा आयपीओ दर शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. कंपनी सोमवारी म्हणजेच 29 एप्रिल रोजी परतावा सुरू करेल, तर परताव्यानंतर त्याच दिवशी शेअर्स वाटप करणाऱ्यांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील.

दीपक बिल्डर्सचा येणार आयपीओ

अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षेत्रातील कंपनी दीपक बिल्डर्स आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड लवकरच आपला आयपीओ बाजारात दाखल करणार आहे. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सुपूर्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आयपीओकरीता कागदपत्रे जमा करणारी दीपक बिल्डर्स ही पहिली कंपनी ठरली आहे.

कंपनी 1.2 कोटी नवे समभाग सादर करणार आहे तर प्रवर्तक दीपक कुमार सिंघल व सुनीता सिंघल 24 लाख समभागांची विक्री करणार आहेत. कागदपत्रांनुसार 95 कोटी रुपयांचा वापर कंपनी भांडवलरुपात करणार असून 30 कोटी रुपयांचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार आहे. याशिवाय रोजच्या कामकाजासाठीदेखील काही रक्कम वापरली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.