महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जितो’चे देशाच्या विकासात मोठे योगदान

10:37 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंगी यांचे गौरवोद्गार : नव्या व्यवस्थापन मंडळाचा शपथविधी

Advertisement

बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन हे व्यापार क्षेत्रात कार्यरत असून देशाच्या विकासात संघटनेचे मोठे योगदान आहे, असे मत राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंगी यांनी व्यक्त केले. जितो बेळगाव विभागाच्या 2024-26 साठीच्या नव्या व्यवस्थापन मंडळाच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते.केएलई सभागृहात नुकत्याच झालेल्या जितोचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल व इतर पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभात सुनील शिंगी पुढे म्हणाले, जितोची सुरुवात झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी ही संस्था केवळ भारतापुरती मर्यादित न ठेवता जागतिक स्तरावर तिचा विस्तार करण्याचे सूचित केले होते.

Advertisement

त्यानंतर देशभरातील 70 हून अधिक विभाग व जगभरातील 14 देशांच्या विकासात जितोने आपले योगदान दिले आहे. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, जितोचे कार्यक्षेत्र केवळ शहरी भागापुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही संस्थेच्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, जैन समाज हा छोटा समाज असूनही सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन व्यवसायात प्रगती करीत आहे. व्यवसायावरील निष्ठा, विश्वास व प्रामाणिकपणामुळे हा समाज ओळखला जातो. आपण जितोशी जवळून परिचित आहे. या संस्थेचे उपक्रम नेहमीच समाजहिताचे आहेत. यापुढेही समाजहितासाठी जितोने झटावे. माजी आमदार संजय पाटील यांनी जितो संघटना ही अतिशय शिस्तप्रिय व सक्रिय संस्था असल्याचे सांगितले.

या संस्थेचे पदाधिकारी समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असतात. ही संस्था इतर संस्थांसाठी आदर्श आहे. नव्या व्यवस्थापन मंडळाने अधिक कार्य करावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. केकेजी झोनचे अध्यक्ष अशोक सालेचा, व्हा. चेअरमन प्रवीण बाफना, खजिनदार ओमप्रकाश जैन आदी यावेळी उपस्थित होते. 2024-26 वर्षासाठी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन इंचल, सरचिटणीसपदी अभय हादिमनी, खजिनदारपदी राजरतन दोड्डण्णावर आदींनी पदभार स्वीकारला. माजी अध्यक्ष वीरधवल उपाध्ये यांनी स्वागत केले. अशोक कटारिया यांनी अहवाल वाचन केले. जयदीप लेंगडे यांना जितोरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. अभय हादिमनी यांनी आभार मानले. अंकिता खोडा यांनी सूत्रसंचालन केले.

 कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम 

जितोचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील विविध शहरात कोरोनाच्या रुग्णांना औषधे पुरविण्याचे काम त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article