For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लंतरानी’मध्ये जितेंद्र कुमार

06:28 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लंतरानी’मध्ये जितेंद्र कुमार
Advertisement

ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट

Advertisement

वेबसीरिजच्या जगतातील दमदार अभिनेता जितेंद्र कुमार ‘लंतरानी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुरविंदर सिंह यांनी केले आहे. या चित्रपटात जॉनी लिव्हर देखील दिसून येतील. हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. लंतरानी चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लंतरानी या चित्रपटात तीन वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या कहाण्या असणार आहेत. गुरविंदर सिंह यांच्या कहाणीत जितेंद्र कुमारसोबत जॉनी लिव्हर झळकणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लंतरानीचा अर्थ मोठमोठ्या थापा मारणे असा होतो. या कहाणीत अनेक व्यक्तिरेखा आहेत, परंतु यातील खरा लंतरानी कोण याचा खुलासा 9 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जितेंद्र कुमारने नमूद केले आहे.

Advertisement

‘लंतरानी’मधील माझी व्यक्तिरेखा रोमांचित करणारी आहे. प्रेक्षक मला एका नव्या भूमिकेत पाहणार असल्याचे त्याने म्हटले आहे. जितेंद्र अलिकडेच ‘ड्राय डे’मध्ये गन्नू या भूमिकेत दिसून आला होता. कोटा फॅक्ट्री, पंचायत यासारख्या वेबसीरिजमध्ये त्याने काम केले आहे. चाहते आता ‘पंचायत’ या सीरिजच्या नव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत.

Advertisement
Tags :

.