For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ड्राय डे’मध्ये जितेंद्र अन् श्रिया

06:22 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘ड्राय डे’मध्ये जितेंद्र अन् श्रिया
Advertisement

ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओची लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’मधील सचिवजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार आता लोकप्रिय ठरला आहे. जितेंद्र आता ‘ड्राय डे’ या चित्रपटात दिसून येणार आहे. दारूबंदीच्या सामाजिक मुद्द्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदशिंत करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून या चित्रपटासंबंधीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी ‘ड्राय डे’ चे पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले होते. यात जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर एकत्र दिसून आले होते. सौरभ शुक्ला यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांकरता सादर करण्यात आला आहे.

हा ट्रेलर पाहून या चित्रपटात दारूबंदीची कहाणी दर्शविण्यात आल्याचे दिसून येईल. या चित्रपटात जितेंद्र, श्रियासोबत अन्नू कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 22 डिसेंबर रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात जितेंद्र हा एका नेत्याची भूमिका साकारत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.