For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओचा नवीन प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’ लाँच

06:24 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिओचा नवीन प्लॅटफॉर्म ‘जिओ हॉटस्टार’ लाँच
Advertisement

ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा, डिस्ने प्लसमधून विलीनीकरणातून नवा प्लॅटफॉर्म

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

जिओ स्टारने ‘जिओ हॉटस्टार’ हा एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. हा प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या विलीनीकरणातून तयार करण्यात आला आहे. यामुळे आता वापरकर्ते जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट एकाच ठिकाणी पाहू शकतील. वायकॉम-18 आणि स्टार इंडियाने अलीकडेच जिओ स्टारशी हातमिळवणी केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असलेल्या कंटेंटच्या अॅक्सेससाठी तीन महिने आणि एक वर्षाचे सबक्रिप्शन प्लॅन देण्यात आले आहेत. एआय पॉवर्ड इनसाइट्स-मल्टी-अँगल ह्यूइंग सारखी वैशिष्ट्यो देखील उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

4के स्ट्रीमिंग व्यतिरिक्त, जिओ हॉटस्टार एआय पॉवर्ड इनसाइट्स, रिअल-टाइम स्टॅट्स ओव्हरले, मल्टी-अँगल ह्यूइंग आणि अगदी ‘स्पेशल इंटरेस्ट’ फीड सारखी वैशिष्ट्यो देखील देईल. जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅन तीन महिन्यांसाठी 149 रुपयांपासून सुरू होणार आहे. जिओ हॉटस्टारचे सीईओ किरण मणी म्हणाले की या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट सर्व भारतीयांना प्रीमियम मनोरंजन प्रदान करणे आहे. 1.4 अब्जाहून अधिक भारतीयांना 10 भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या कंटेंटसह, जिओ हॉटस्टार वापरकर्त्यांना एकाच अॅपवरून त्यांचे आवडते शो, चित्रपट आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्यास सक्षम करणार आहे.

वॉर्नर ब्रदर्स आणि एचबीओ कंपन्यांचे कंटेंट  उपलब्ध होणार

जिओ हॉटस्टारने एका घोषणेमध्ये म्हटले आहे की जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे ग्राहक नवीन प्लॅटफॉर्मवर सहजपणे जाऊ शकतील. मूळ कंटेंट व्यतिरिक्त, जिओ हॉटस्टार एनबीसी युनिव्हर्सल पीकॉक, वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी, एचबीओ आणि पॅरामाउंट सारख्या कंपन्यांचे कंटेंट देखील ऑफर करेल, जे सध्या इतर कोणतीही स्ट्रीमिंग सेवा प्रदान करत नाही.

Advertisement
Tags :

.