For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जियोची इशु किमत 1065 ते 1119 रुपये राहण्याची शक्यता

06:43 AM Oct 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
जियोची इशु किमत 1065 ते 1119 रुपये राहण्याची शक्यता
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

बहुप्रतिक्षीत अशा जियो प्लॅटफॉर्म आयपीओबाबत हालचाली वेगवान झाल्या असून पुढील आठवड्यात आयपीओ सादर होण्याची शक्यता वाढताना दिसते आहे. याचदरम्यान कंपनीने आयपीओची इशु किंमत अखेर जाहीर केली असून ती 1065 रुपये ते 1119 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. तरीही याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजअंतर्गत सदरचा आयपीओ सादर होणार आहे. गुंतवणूकदारांची याकडे विशेषकरुन नजर लागून राहिलेली आहे. हा आयपीओ साधारण 10.3 लाख कोटी रुपये मूल्याचा असू शकतो, असे म्हटले जात आहे.

Advertisement

कधी होऊ शकतो खुला

ठरल्याप्रमाणे आयपीओ बाजारात दाखल झाला तर हा भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा मूल्याचा आयपीओ होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीओ पुढील आठवड्यात 21 ऑक्टोबरला खुला होऊ शकतो. 28 ऑक्टोबरला समभाग बाजारात सुचीबद्ध होण्याचे संकेत

Advertisement
Tags :

.