For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जिओचा आयपीओ 21 ला येण्याची शक्यता

07:00 AM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिओचा आयपीओ 21 ला येण्याची शक्यता
Advertisement

ह्dयुंडाईचा विक्रम मोडत, देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स 21 ऑक्टोबरला आयपीओ आणू शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनी या आयपीओद्वारे सुमारे 37,700 कोटी रुपये उभारणार आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी, 2024 मध्ये ह्युंडाई मोटर इंडियाचा 27,858 कोटी रुपयांचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता.

Advertisement

रिलायन्स ग्रुपचा 20 वर्षांतील पहिला आयपीओ

गेल्या दोन दशकांतील रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा हा पहिला आयपीओ असेल. तसेच, रिलायन्स ग्रुपच्या ग्राहक-केंद्रित व्यवसायाची ही पहिली लिस्टिंग असेल. यापूर्वी, 19 जून रोजी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली होती. आयपीओमधून उभारलेला संपूर्ण निधी कंपनीला दिला जाईल.

हा इश्यू पूर्णपणे ‘फ्रेश इश्यू“ असेल. यामध्ये कोणताही विद्यमान शेअरधारक आपला शेअर विकणार नाही. म्हणजेच, आयपीओमधून उभारलेली संपूर्ण रक्कम थेट कंपनीकडे जाईल. रिलायन्स जिओ 27,500 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार. उभारलेल्या निधीपैकी सुमारे 27,500 कोटी रुपये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी वापरली जाईल, जी एकूण इश्यू आकाराच्या कमाल 25 टक्के पर्यंत मर्यादित असेल.

सर्वात मोठी दूरसंचार कंपनी

जिओ प्लॅटफॉर्म्स सध्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या अखेरीस, कंपनीचा एकूण ग्राहकवर्ग 52.44 कोटी होता. मागील वर्षी आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा आकडा 48.82 कोटी होता.

Advertisement
Tags :

.