For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जियो प्लॅटफॉर्मच्या आयपीओ प्रक्रियेला आला वेग

06:30 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
जियो प्लॅटफॉर्मच्या आयपीओ प्रक्रियेला आला वेग
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

आयपीओ बाजारात घडामोडी घडत आहेत. यात आता देशातील सर्वात मोठा आयपीओ जियो प्लॅटफॉर्म यांच्या आयपीओ प्रक्रियेला वेग आल्याचे सांगितले जात आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शेअरबाजाराला उपलब्ध झाली आहे.

सदरचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 21 ते 23 ऑक्टोबर या अवधीत खुला होऊ शकतो. तसेच 28 ऑक्टोबर रोजी आयपीओ बीएसई एनएसईवर सुचीबद्ध होऊ शकतो. या तारखा अंतिम नाही आहेत. बाजारातील एकंदर स्थितीचा अंदाज बांधून तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही म्हटले जाते.

Advertisement

किती मोठा असणार आयपीओ

जियो प्लॅटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रिजची डिजिटल व्यवसाय सांभाळणारी कंपनी आहे. यात रिलायन्स जियो इन्फोकॉम सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्या सहभागी आहेत. या आयीपीओतून 3.8 अब्ज डॉलर्स उभारले जाऊ शकतात. कंपनीने आयीपोओसंबंधीत डीआरएचपी अर्ज सेबीकडे दाखल केला आहे. विविध शहरात रोड शोही घेऊन झाले आहेत. तेव्हा आता गुंतवणूकदारांचे आयपीओ इशु किमतीकडे असणार आहे.

आयपीओबाबत...

आयपीओतून उभारलेल्या रक्कमेपैकी 27,500 कोटी रुपये हे रिलायन्स जियो इन्फोकॉमचे कर्ज चुकवण्यासाठी वापरले जाणार आहेत. इतर रक्कम सामान्यसह कॉर्पोरेट आवश्यकतांसाठी खर्चली जाणार आहे. कंपनी शेअरबाजारात सुचीबद्ध होईलच पण याचा परिणाम रिलायन्सच्या डिजिटल व टेलिकॉम व्यवसायातील वित्तसंबंधीत कामगिरीवरही दिसू शकतो, असे म्हटले जात आहे.

Advertisement
Tags :

.