For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ पुढील वर्षी

06:33 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ पुढील वर्षी
Advertisement

मूल्य 148 अब्ज डॉलर्सवर पोहचणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड यांचा आयपीओ पुढील वर्षी पहिल्या सहामाहीमध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्या संदर्भातल्या तयारीला कंपनीने वेग दिला आहे. कंपनीचा समभाग शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर मूल्य 148 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उत्तम शुल्करचना, 5 जीसेवा वापरण्यासंदर्भातला वाढलेला उत्साह यामुळे दूरसंचार क्षेत्रातील जिओला वाढीची आशा निर्माण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ऑगस्टमध्ये समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत वर्ष 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये रिलायन्स जिओचा समभाग सूचीबद्ध होणार असल्याचे म्हटले होते. या संदर्भातल्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Advertisement

कंपनीची ओळख

जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची दूरसंचार क्षेत्रातील सहायक कंपनी असून समूहातील डिजिटल व्यवसाय हा जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल)यांच्या अंतर्गत येतो. फेसबुकची सध्याला जिओत 10 टक्के हिस्सेदारी आहे. गुगलकडे साधारण 7.7 टक्के तर जेपीएलमध्ये पाहता सध्याला 66.3 टक्के हिस्सेदारी रिलायन्सची आहे.

Advertisement
Tags :

.