जिओ पेमेंट्स बँक 7.9 कोटींचे समभाग खरेदी करणार
जिओ फायनान्शियल यांचा स्टेट बँकेसोबत करार
मुंबई :
जियो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (जेएफएसएल) ने 4 मार्च रोजी घोषणा केली की त्यांच्या संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड (जेपीबीएल) चे 7.9 कोटी समभाग 104.54 कोटी रुपयांना खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. जियो पेमेंट्स बँक लिमिटेडच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये सध्या व्इएथ् कडे 82.17 टक्के हिस्सा आहे, जो कंपनी आणि समभाग एसबीआय यांचा संयुक्त उपक्रम आहे. या अधिग्रहणानंतर, जेपीबीएल ही जेएफएसएल जेएफएसएल ची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल हे अधिग्रहण 45 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे
जेएफएसएलने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ‘हे अधिग्रहण रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेच्या अधीन राहून पूर्ण होईल. हे अधिग्रहणभ च्या मान्यतेच्या 45 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.‘ मे 2024 मध्ये, कंपनीने ‘जियो फायनान्स‘ अॅपचे पायलट व्हर्जन सादर केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून वेगळे झालेले जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, गुंतवणूक आणि वित्तपुरवठा, विमा ब्रोकिंग, पेमेंट बँक, पेमेंट अॅग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे सर्व्हिसेस या क्षेत्रात कार्यरत आहे.