For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओ आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत

06:00 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिओ आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत
Advertisement

जिओची मोबाईल, इंटरनेटसह आता नव्या प्रवासाचे कंपनीचे संकेत : जिओच्या आयपीओला  डीआरएचपीकडून मंजुरी

Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली

बहुचर्चित रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) 2026 शुक्रवारी पार पडली. मोबाईल आणि इंटरनेटचे जग बदलल्यानंतर, रिलायन्स जिओ (जेपीएल) आता आणखी एक मोठा धमाका करणार असल्याचे संकेत त्यातून समोर आले आहेत. कंपनीने शेअर बाजारातील आयपीओसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांना (डीआरएचपी) 19 जून 2026 रोजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता ते लवकरच बाजार नियामक सेबीकडे पाठवले जाईल.

Advertisement

27 कोटी शेअर्स सादर करणार

जिओच्या आयपीओमध्ये, 10 रुपये दर्शनी मूल्याचे सुमारे 27 कोटी नवीन शेअर्स बाजारात आणले जातील. सामान्य नागरिक आणि मोठे गुंतवणूकदार हे शेअर्स खरेदी करू शकतात. शेअरची सिग्नेचर प्राईस काय असेल, हे येत्या काळात गुंतवणूकदारांची मागणी पाहून ठरवले जाईल.

गुंतवणूकदारांसाठी उज्ज्वल भविष्य

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, जिओचा आयपीओ हा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आहे. याचा रिलायन्सच्या शेअरधारकांना फायदा होईल आणि नवीन गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची सुवर्णसंधीही मिळेल. त्यांनी विश्वास व्यक्त केला की जिओचे भविष्य अधिक उज्ज्वल आहे.

52 कोटी ग्राहकांची अतुलनीय ताकद

जिओ ही आज भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी आहे. तिचे 52.4 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मोठी गोष्ट म्हणजे, 26.8 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह चीन वगळता संपूर्ण जगात जिओचे 5जी नेटवर्क सर्वात मोठे आहे. याशिवाय, जिओचे जिओएअरफायबर देखील 1.3 कोटी घरांपर्यंत पोहोचले आहे.

प्रत्येक जिओ कॉलमध्ये एआयचा वापर होईल

आकाश अंबानी म्हणाले की, जिओ आपल्या नेटवर्क पायाभूत सुविधांमध्ये या एआयचा समावेश करत आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात प्रत्येक जिओ कॉल पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट होईल. ते म्हणाले की, एआय एजंट कॉल ऐकून त्याचे ट्रान्सक्रिप्शन (लेखन) तयार करू शकेल. तो एका कॉलमध्ये 10 वेगवेगळ्या लोकांना ओळखूही शकेल.

जिओने सॅटेलाइट इंटरनेट, एआय आधारित कॉलिंग सेवा

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, जिओने आपल्या भविष्यासाठी अनेक मोठ्या योजना सादर केल्या. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, कंपनी सॅटेलाइट इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठी पावले उचलणार आहे. त्याचवेळी, मुकेश अंबानी यांनी मायजिओ आपला एआय आधारित वैयक्तिक सहाय्यक बनवण्याची योजना देखील उघड केली. भारताचा स्वत:चे सॅटेलाइट नेटवर्क तयार करण्याचा विचार आकाश अंबानी म्हणाले की, जिओ भारतासाठी आपले लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट नेटवर्क विकसित करण्याच्या शक्यतांवर काम करत आहे. देशाच्या सॅटेलाइट आधारित इंटरनेट आणि दळणवळण सेवा मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे. ते म्हणाले की, उत्तम कव्हरेज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी जिओ या दिशेने जगातील प्रमुख सॅटेलाइट कंपन्यांसोबत भागीदारी देखील करत आहे.

Advertisement
Tags :

.