जिओ आयपीओ; दमदार सबस्क्राईब
देशातील सर्वात मोठा आयपीओ : मोठ्या गुंतवणूकादारांनी 8 पट आणि सामान्यांनी 0.65 पट सबस्क्राईब केले
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा देशातील सर्वात मोठा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी, अवघ्या 1 तासात पूर्णपणे सबक्राईब झाला. एका शेअरचा प्राईस बँड 1,065 ते 1,119 इतका आहे. हा आयपीओ 23 ऑक्टोबरपर्यंत खुला राहणार आहे. गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्यासाठी किमान 13,428 गुंतवावे लागणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 14 लॉट्स म्हणजेच 168 शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी 1.87 लाख खर्च येईल. ग्रे मार्केटनुसार लिस्टिंगवर 22 टक्के इतका परतावा मिळू शकतो.
सबक्रिप्शनची स्थिती
(दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी)
हा आयपीओ एकूण 1.64 पट ओव्हरसबक्राइब झाला आहे. यामध्ये, एकूण 19,75,25,934 शेअर्सपैकी गुंतवणूकदारांकडून 32,41,00,728 शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सबक्रिप्शन त्याच्या कोट्यापेक्षा 4.86 पट अधिक बोली लावून मिळाले आहे, जे प्रामुख्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केले आहे. उर्वरित श्रेणींमध्ये, अर्ज अजूनही कोट्यापेक्षा कमी आहेत.
कंपनी उभारलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड
या आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर कंपनीची प्रमुख उपकंपनी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. याव्यतिरिक्त, या निधीचा वापर सामान्य कॉर्पोरेट कार्यांसाठी देखील केला जाईल. इश्यूनंतर, प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाची शेअरहोल्डिंग 66.43 टक्के वरून 64.48 टक्के पर्यंत कमी होईल, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग 33.57 टक्के वरून 35.52 टक्के पर्यंत वाढणार आहे.
ठळक बाबी....
?कर्मचारी: यांच्या भावांचा 123 टक्के आयपीओ सबक्राइब झाला आहे.
?शेअरधारक: रिलायन्सच्या शेअरधारकांनी 127 टक्के शेअर्ससाठी बोली लावली आहे.
?कर्मचारी आणि शेअरधारकांसाठी 3,000 कोटींचा शेअर रिझर्व्ह
?कर्मचाऱ्यांसाठी: कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटींपर्यंतचा शेअर रिझर्व्ह ठेवला आहे.
?कर्मचारी सवलत: कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 54 ची सवलत देखील मिळेल.
?आरआयएल शेअरधारक: पात्र शेअरधारकांसाठी 2,500 कोटींपर्यंतचा कोटा.
शेअर्सचे लिस्टिंग 1371 वर होऊ शकते
?शेअर ग्रे मार्केटमध्ये 22 टक्के वधारला म्हणजेच प्रति शेअर 252 चा प्रीमियम गाठला आहे.
?ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जीएमपीनुसार, 1,119च्या उच्च किंमत बँडमध्ये तो 1371 वर लिस्ट केला जाऊ शकतो.
इश्यूमध्ये कोणासाठी किती शेअर राखीव?
?पात्र संस्थात्मक खरेदीदार : 50 टक्के शेअर राखीव
?बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार : 15 टक्के शेअर राखीव
?किरकोळ गुंतवणूकदार : 35 टक्के शेअर राखीव
