जिओ-इनव्हिडीयाची भागीदारी ‘एआय’साठी सकारात्मक
एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग व रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यात दिर्घ संवाद
वृत्तसंस्था/ मुंबई
इनव्हिडीआय एआय समिट 2024 सध्या मुंबईत सुरू आहे. एआय समिट मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये टेक जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. एनव्हीडियाचे संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी गुरुवारी एनव्हीडिया एआय समिटच्या मंचावर अनेक मुद्यांवर चर्चा केली.
रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी या समिट दरम्यान सांगितले की, जिओ आता जगातील सर्वात मोठी डेटा कंपनी बनली आहे. त्याच वेळी एनव्हीडिया सीईओने घोषणा केली की रिलायन्स आणि एनव्हीडिया संयुक्तपणे भारतात एआय पायाभूत सुविधा तयार करत असल्याचे सांगितले आहे. यामुळे आगामी काळासाठी रिलायन्स व एनव्डिडीआयची भागीदारी मजबूत राहणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, मुकेश अंबानी म्हणाले की, भारत वेगाने जगाचे इनोव्हेशन हब बनत आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, भारत नजीकच्या भविष्यात जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असेल. जगात समृद्धी आणि समानता आणण्यासाठी आपण बुद्धिमत्तेचा वापर करू शकू. ते पुढे म्हणाले की, भारतात जगातील सर्वोत्तम डिजिटल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा आहेत.
एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी रिलायन्स आणि एनव्हीडिया यांच्यातील भागीदारी भारतासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे आणि सांगितले की रिलायन्स आणि एनव्हीडिया भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. जेन्सेन हुआंग पुढे म्हणाले की, भारताने एआयचा लाभ घेण्यासाठी तयार असले पाहिजे आणि ही भागीदारी देशाच्या क्षमता वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. याशिवाय जेन्सेन हुआंग म्हणाले की, भारतात संगणक अभियंते मोठ्या संख्येने असणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे.
एनव्हीडियाकडून हिंदी एआय मॉडेल लाँच
एनव्हीडियाने हिंदी एआय मॉडेलदेखील लाँच केले. रिलायन्सचे चेअरमन अंबानी म्हणाले- जिओ टेलिकॉम चांगल्या दर्जाच्या एआय इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोघांनी भारतात एआय सुपर कॉम्प्युटर विकसित करण्याबाबत चर्चा केली असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.