जिओ फायनान्शिअलची नवी योजना
एआयच्या मदतीने डिजिटल ग्राहक जोडणीवर भर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोठ्या जागतिक कंपन्यांसोबतच्या भागीदारीवर भर देत आहे. आपल्या ‘फिन्टेलिजन्स फॉर ऑल“ या संकल्पनेअंतर्गत, कंपनीने म्हटले आहे की, ‘ब्लॅकरॉक आणि अलियान्झसारख्या कंपन्यांसोबतची भागीदारी मालमत्ता व्यवस्थापन आणि विमा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या उत्पादनांचा विस्तार करण्यास मदत करणार आहे. fिजओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या संचालक, ईशा अंबानी म्हणाल्या की, भारतातील तरुण पिढीमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा वापरण्याची पद्धत वेगाने बदलत आहे.
आजच्या ग्राहकांना जलद, सोप्या आणि पारदर्शक सेवांची अपेक्षा आहे. त्या म्हणाल्या की, कंपनी आपल्या जिओफायनान्स अॅपमध्ये एजेंटिक एआय वापरत आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा पुरवता येतील. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या उलाढालीत प्रभावी वाढ नोंदवली आहे. लाभांश वगळता कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न 78 टक्क्यांनी वाढून 3,274 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळणारे उत्पन्न 272 टक्क्यांनी वाढून 1,390 कोटी रुपये झाले आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या ब्लॅकरॉकसोबतच्या मालमत्ता व्यवस्थापन संयुक्त उपक्रमाचीही वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे. या उपक्रमाची एयुएम 16,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी नवीन गुंतवणूकदारांसोबत तसेच देशातील 30 शहरांच्या बाहेरील ग्राहकांसोबत भागीदारी केली आहे.
आर्थिक सेवा अधिक सुलभ करण्यावर भर
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया म्हणाले की, कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत आहे आणि आपली क्षमता अधिक मजबूत करत आहे. ‘सर्वांसाठी फिनटेलिजन्स‘ या संकल्पनेअंतर्गत, प्रत्येक भारतीयासाठी आर्थिक सेवा सोप्या, स्मार्ट आणि सुलभ बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.